19.1 C
New York

Cricket News :  मुरलीधरन, अँडरसनच्या यादीत युवराज.. तिन्ही माजी खेळाडूंचं एकच रेकॉर्ड; जाणून घ्या…

Published:

क्रिकेट जगतात आतापर्यंत अनेक (Cricket News) खास रेकॉर्ड झाले आहेत. काही रेकॉर्डस असे आहेत जे ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होताल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास रेकॉर्ड्सची माहिती देणार आहोत. या रेकॉर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर एक फिरकी गोलंदाज, दुसऱ्या क्रमांकावर एक अष्टपैलू खेळाडू तर तिसऱ्या क्रमांकावर एक वेगवान गोलंदाज आहे. हे तिन्ही खेळाडू वेगवेगळ्या देशांचे आहेत.

पहिल्या क्रमांकावर श्रीलंका संघाचा माजी फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहे. मुरलीधरन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. यानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याचा (Yuvraj Singh) नंबर आहे. युवराजने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक लगावले आहे. एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचेही रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आहे. अँडरसन क्रिकेट जगतात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. या तीन खेळाडूंमध्ये नेमकं काय साम्य आहे याची माहिती घेऊ या..

Cricket News तिघांनी कधीच कप्तानी केली नाही

युवराज, मुरलीधरन आणि अँडरसन तिघेही दिग्गज खेळाडू होते. परंतु या तिघांनी कधीच कर्णधारपद सांभाळलं नाही. तशी संधी त्यांना कधीच मिळाली नाही. यामागे कारणे अनेक असतील पण या तिन्ही खेळाडूंना कधीच कर्णधार पदाची संधी मिळाली नाही. श्रीलंकेच्या संघात (Sri Lanka) सर्वाधिक सामने खेळूनही मुरलीधरनला कधीच कर्णधार होता आलं नाही. याबाबतीत तो अव्वल क्रमांकावर राहिला आहे. मुरलीधरनने एकूण 133 कसोटी, 350 वनडे आणि 12 टी 20 असे एकूण 495 सामने खेळले.

इतके सामने खेळले त्यामुळे त्याच्याकडे अनुभवाची कोणतीच कमतरता नव्हती तरी देखील त्याला कर्णधार होता आलं नाही. सन 2010 मध्ये मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती जाहीर केली होती.

या यादीत युवराज सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवराजने 40 कसोटी, 305 वनडे आणि 58 टी 20 सामने खेळले आहेत. एकूण 402 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतरही युवीला कधीच कर्णधार होता आलं नाही. युवराजने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

इंग्लंडचा वेगवान (Team England) गोलंदाज जेम्स अँडरसनने याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अँडरसनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत 188 कसोटी, 194 वनडे आणि 19 टी 20 असे एकूण 401 सामने खेळले. तरी देखील त्याला संघाचे कर्णधार म्हणून एकदाही संधी मिळाली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img