21.7 C
New York

Onion : राज्यात किती कांदा शिल्लक?

Published:

अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यात कांदा (Onion) आयात झाल्याच्या माध्यमांमधून बातम्या येताच केंद्र सरकार खडबडून जागं झाले. शेतकरी कल्याण विभागाचे विपणनचे अर्थ सल्लागार केंद्र सरकारने कृषी मंत्रालयातंर्गत कविरासन या एक सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवले. नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याची झालेली लागवड आणि जुना साठवणूक केलेला उन्हाळा कांदा किती शिल्लक आहे याची माहिती हे सदस्य घेत आहेत. देशात कांदा साठा शिल्लक असताना थेट इतर देशात कांदा आणण्यात येत असल्याने कृषी विभाग गांगरून गेला आहे. आता एक सदस्यीय पथक पुढील अहवाल सादर करेल.

Onion केंद्राच्या धोरणावर टीका

केंद्र सरकारकडून यापूर्वी चार ते पाच वेळा कांदा लागवड व कांद्याच्या आवकेची माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले. कांद्याचे बाजार भाव कसे नियंत्रणात ठेवता येईल आतापर्यंत या पथका सोबत जी ही चर्चा झाली ती यावरच झाली. त्यांनी आमच्या सोबत चर्चा केली या चर्चेदरम्यान बाजार भाव हे केवळ पंधरा ते वीस दिवसांसाठी वाढतात. शेतकऱ्यांनायावेळी थोडे फारच दर अधिकचे मिळतात, अशी टीका शेतकऱ्यांनी केली.

लक्षात ठेवा! १ ऑक्टोबरपासून होणार ‘हे’ पाच बदल

Onion इतर देशातून कसा कांदा आयात होतो?

हा कांदा जवळजवळ चार ते सहा महिने साठवणूक केलेला असतो. शेतकऱ्यांनी कांदा ज्यावेळी निर्यात बंदी होती त्यावेळी हजार रुपयांनी विक्री केला. कांदा आता मूठभर लोकांच्या हातात शिल्लक असताना निर्यात खुली केली. केंद्र शासन आता कुठेतरी निर्यात करा सांगतोय ही दुर्दैवी बाब आहे.अफगाणिस्तान सारख्या देशातून दुसरीकडे पंजाब मध्ये कांदा आयात केला जातोय या कांद्याला आयातीवर शुल्क नाही आणि भारतीय निर्यात होणाऱ्या कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्क लावले जाते. केंद्र सरकार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील शेतकऱ्यांसाठी काम करतोय का असा सवाल बाजार समितीचे शेतकरी प्रतिनिधी संचालकांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img