मुंबईत दुपारपासूनच जोरदार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. (Heavy Rain) काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाऊस जोर धरत असल्याकारणाने मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरुच आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसासाठी तर पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं. 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रासह, गुजरात, कोकण, गोव्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्ात आलीयं. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक 26 सप्टेंबर 2024) सकाळी 8.30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबईत अतिमुसळधार! लोकल आणि एक्सप्रेस गाड्या बंद
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे उद्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. वसई विरार नालासोप-यात मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई तील मुख्य रस्ते गेले पाण्याखाली गेले आहेत. वसई पश्चिम अंबाडी रोड, शंभरफुटी रोड, सिक्सिफिट रोड, दिवानमान, समता नगर, चुळणे, वसई पूर्व एवर्षाइन, नवजीवन, वालीव, सातीवली, नालासोपारा पूर्व चंदन नाका, आचोला रोड, नागिनादास पाडा, विजय नगर, नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ, पाटणकरपार्क, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, जकात नका, विरार पूर्व विवा जांगिड परिसरात पाणी साचले आहे.