बदलापूरमधील चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) करण्यात आला आहे. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी केलेल्या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला आहे. काल पहाटे ही घटना घडली. आज याबाबतची आणखी एक अपडेट आली आहे. अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या व्हॅनमध्ये आढळून आल्या आहेत.
अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर आज फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनची तपासणी केली. यावेळी फॉरेन्सिक टीमला व्हॅनमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. फॉरेन्सिक लॅबला एकूण चार गोळ्या सापडल्या आहेत. यातील तीन गोळ्या अक्षय शिंदेने झाडल्या होत्या. पीआय संजय शिंदे यांनी तर एक गोळी झाडली होती. या गोळ्यांचा रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या. पोलीस व्हॅनमधून फॉरेन्सिक टीमने रक्ताचे नमुने घेतले आहेत. दोन वेगवेगळ्या जागेवरून रक्ताचे नमुने फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतले आहेत. पोलीस व्हॅनमध्येच यावरून हा ही घटना झाल्याचं स्पष्ट होत आहे.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी गृह मंत्रालय ॲक्शन मोडवर
Akshay Shinde Encounter महिलांचा फटाके वाजवून जल्लोष
दरम्यान, अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने बदलापूरमधील महिलांनी बदलापूर स्थानकाबाहेर फटाके वाजवून जल्लोष केला. एका नराधमाचा आज अंत झाला याचा आम्हाला आनंद आहे. आता अशा घटना भविष्यात कमी होतील, अशी आशा आहे, असं या महिलांनी म्हटलं आहे. तसेच महिलांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आम्ही पोलिसांचे आभार मानतो, असंही या महिलांनी म्हटलं आहे.
Akshay Shinde Encounter आमदाराने फटकारले
तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी या प्रकरणी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काऊंटरप्रकरणी विरोधकांनी थोडेतरी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला. बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. त्यावेळी राज्यातील विरोधी पक्षाचे नेतेही सामान्य नागरिकांसह या नराधमाला फाशी देण्याची मागणी करत होते. आणि आज अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मारला गेल्यानंतर हेच विरोधक राज्यसरकार आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे काय उभे करत आहेत? असा संतप्त सवाल भोईर यांनी विचारला आहे.