उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला शेअर बाजार नियामक सेबीने एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने 15 लाख रुपयांचा दंड रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे (SEBI) मुख्य अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना ठोठावला. 45 दिवसांच्या आत दोघांनाही दंड भरावा लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
SEBI जीपीसीएल कर्ज मंजूर केलं होतं
SEBIने (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) काल सोमवारी 23 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे, की त्यांनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत चालू तपास पूर्ण केला आहे. नियामकाने सांगितलं की, तपासात असं आढळून आलं आहे की ज्या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी सेबीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कॉर्पोरेट कर्ज किंवा जीपीसीएल कर्ज मंजूर केले होते. कर्जाची मंजुरी कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्टपणे निर्देश दिले होते की अशा दिली जाणार नाही तरीही कर्ज देण्यात आलं आहे.
SEBI पाच वर्षांसाठी बंदी
अनमोल अंबानी यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी Acura प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं, तर संचालक मंडळाने 11 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला आणखी कर्ज न देण्याचे निर्देश दिले होते. आपल्या आदेशात, सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर 24 लोकांना सिक्युरिटीज मार्केटमधून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
SEBI मास्टरमाईंड होते
सेबीने म्हटलं आहे की अनिल अंबानी कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी मार्केटशी संबंधित राहणार नाहीत किंवा ते कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पदावर काम करणार नाहीत. 2018-19 मध्ये रिलायन्स होम फायनान्सच्या निधी वळवण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, SEBI ने तपास केला आणि असे दिसून आले की अनिल अंबानी हे या फसवणूक योजनेचे मास्टरमाईंड होते ज्यामुळे भागधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं.