19.1 C
New York

Rain Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Published:

पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार (Rain) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, मुंबईप्रमाणेच पालघर ठाणे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain Update उकाड्यापासून दिलासा

राज्यात आजपासूनच मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वातावरणात वाढलेली आर्द्रता तसंच, मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असल्याने मुंबईकर आधीच उकाड्याने हैराण झालेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झालीय, मात्र आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची तसंच उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिमुसळधार पावसाचा पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अंदाज आहे. मुसळधार पावसाची शक्यता मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी आहे. धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितलं आहे.

Rain Update सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 4-5 दिवसात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कालची स्थिती पाहता मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी त्याचबरोबर करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img