21.7 C
New York

Sharad Pawar : मविआचं जागावाटप कसं होणार? कुणाला किती जागा, शरद पवार म्हणाले

Published:

राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीत जोरदार (MVA) मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर धुसफूस दिसत आहे. त्यानंतर आता जागावाटपातही दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या दहा दिवसांत मविआतील जागावाटप पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे शरद पवार म्हणाले.

बारामती येथे आज शरद पवारांनी माध्यमांश संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जयंत पाटील आणि अन्य वरिष्ठ नेते या उमेदवारांच्या मुलाखती घेतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे एखाद्या जागेवर निवडणूक कुणी लढवावी याबाबत एकवाक्यता असावी अशी आमची रणनीती राहिल. याबाबत मागील तीन दिवसांपासून बैठका होत आहेत.

अखेर मुहू्र्त मिळाला! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ‘या’ दिवशी सुनावणी

जागांचे वाटप सुरू आहे. येत्या दहा दिवसांत हे संपवून लोकांमध्ये जाण्याचा आमचा विचार आहे. यंदा इच्छुकांची संख्या जास्त आहे. अनेक ठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. दहा ते पंधरा हितचिंतक येऊन इच्छुकासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. लोकशाहीत ही सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, निर्णय घ्यायचा म्हटलं तर एकट्याने निर्णय घेता येत नाही. सहकाऱ्यांची मते विचारात घ्यावी लागतात. परिस्थितीचा विचार करून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल असे शरद पवार यांनी स्पष्ट झाले.

आगामी निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे एखादी जागा तिन्ही पक्ष लढवायची म्हणत असतील तर यावर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू आहे. जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करण्यात येईल असे शरद पवार म्हणाले. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) उत्तम काम करत होते. पण त्यांना तुरुंगात टाकलं. खोट्या केसेस त्यांच्यावर दाखल केल्या. नंतर त्यांनी राजीनामा दिला. आता दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदी कर्तुत्ववान अभ्यासू हुशार महिला आहे. ही चांगली गोष्ट आहे अशा शब्दांत शरद पवार यांनी दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Delhi Chief Minister) यांचं कौतुक केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img