19.1 C
New York

Devendra Fadnavis : पुण्यात नव्याने उभारणाऱ्या विमानतळाचं नाव फडणवीसांनी केलं जाहीर

Published:

पुणे शहरात नव्याने (Pune News) विमानतळ उभारण्यात येत आहे. मी मुरलीधर अण्णांचं विशेष कौतुक करतो त्यांनी या विमानतळाबाबत चांगली संकल्पना मांडली. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं अशी संकल्पना होती. मी ही तयारी केली. आता पुढील टप्प्यात नामकरणाचा हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू. येथून प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवू. तेथे प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि गडकरी साहेबांनी घ्यावी असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भाषण झाले. मोहोळ म्हणाले, मागील दहा वर्षांच्या काळात नितीन गडकरींनी खूप प्रकल्प आणले. पुणे शहरातील चांदणी चौकाच्या कामासाठी चारशे कोटी रुपये दिले. कात्रज चौकातील उड्डाणपुलासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद केली. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांसाठी 228 कोटी दिले. यामुळे पुण्याच्या एकूण परिसरात वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

बदलापूर घटनेतील नराधम अक्षय शिंदेची डॉक्टरांसमोर कबुली

सन 2014 आधी 12 किलोमीर रस्ते दर दिवसाला तयार होत होते. पण मागील दहा वर्षांत 28 किलोमीटरची कामे दर दिवसाला होतात. हायवेचं नेटवर्क साठ टक्क्यांनी वाढलं. आता गडकरी साहेब पुण्याच्या वाहतुकीसाठी तुमची मदत लागणार आहे. पुण्याला सगळ्या बाजूने जोडणारे रस्ते आहेत. हे रस्ते ज्याठिकाणी पुण्याला येऊन मिळतात तेथे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. या रस्त्यांच्या कामांसाठी लक्ष द्या, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी गडकरींना केले.

Devendra Fadnavis गडकरींचाही मिळाला शब्द

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात पुणे विमानतळाचा उल्लेख केला. पुण्यात होत असलेल्या या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांंचं नाव देण्याचं निश्चित आहे. राजधानी दिल्लीत केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव आल्यानंतर पंतप्रधानांकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेणारच असे नितीन गडकरी यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी आता शक्यतो राजकारण करत नाही. फक्त समाजकारण करतो. त्यामुळे मी माझ्या तत्वांशी कधीही तडजोड करत नाही. कुणाच्या दबावातही मी कधीच येत नाही, असेही गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img