19.1 C
New York

Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा आज शपथविधी

Published:

आतिशी मार्लेना आज, शनिवार (दि 21 सप्टेंबर)रोजी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. इतर पाच मंत्रीसुद्धा त्यांच्यासोबत(Delhi CM ) शपथ घेणार असून, पुन्हा संधी जुन्या निष्ठावंत मंत्र्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. ‘आप’च्या विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी सिंह मार्लेना यांची नेता म्हणून निवड केली. शनिवारी शपथ घेण्यासाठी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पाचारण केलं. ७० सदस्यीय विधानसभेत ‘आप’चे ६२ आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना मंत्रिमंडळात काही फार बदल होण्याची शक्यता नव्हती.

दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांचे मंत्रिमंडळ राहू शकतं. परंतु, केवळ ६ जणांना मुख्यमंत्र्यांसह शपथ दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिपदाचे एक पद रिक्त ठेवण्यात येणार आहे. या पदावर कुणाची नियुक्ती करावयाची याबद्दल काही दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे. आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसैन, कैलास गहलोत या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.

बदलापूर घटनेतील नराधम अक्षय शिंदेची डॉक्टरांसमोर कबुली

तसंच, यावेळी मुकेश अहलावत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. अहलावत सुलतानपूर माजरा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा यापूर्वी दलित समाजाचे राजकुमार आनंद यांनी देऊन भाजपमध्ये गेल्याने मंत्रिपद रिक्त होते. एक मंत्रिपद मात्र रिक्त ठेवण्यात आलं आहे. यावर अद्यापही एकही मंत्री शपथ घेणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img