13.2 C
New York

Bachchu Kadu : काँग्रेस-भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली, बच्चू कडूंचा हल्लाबोल

Published:

सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. (Bachchu Kadu) महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार असली तरी राज्यात तिसरी आघाडीचा प्रयत्नही सुरू आहे. मुख्य लढत तसेच जागावाटपा संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वारंवार बैठका देखील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्या नेत्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही, ते पक्ष सोडून जात आहे. अशातच महायुती सरकारला पाठिंबा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपावर निशाणा साधला आहे. (Bachu Kadu stated that Congress and BJP have created a looting system so the days have come to uproot both the parties)

एका सभेत बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून महायुती सरकारवर आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची लढाई गेल्या 75 वर्षांपासून आपण लढतो आहोत. मात्र अजूनही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मानसन्मान भेटत नाही. शेतकऱ्यांवर अजूनही आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याने बदलाही भावना निर्माण होत आहे. त्यामुळे आता येणारी ही निवडणूक बदला घेणारी असेल. ज्यांनी-ज्यांनी धर्म आणि जात सांगून आपली मतं घेतली आहेत, त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा मविआत यावं, जयंत पाटील यांची खुली ऑफर…

बच्चू कडू म्हणाले की, कांद्यामुळे आपल्याला ज्यांनी-ज्यांनी रडवलं, मग काँग्रेस असो वा भाजपा. दोन्ही पक्षांनी गेल्या 75 वर्षात राज्य केलंय. दोघांनीही आपल्या डोळ्यातून पाणी काढलंय. शेतकरी रात्रींचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो, मेहनत, कष्ट करतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीही परवा न करता शेतकरी शेतीमधून पीक घेतो. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. अशावेळी दोन्ही पक्षांना उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img