19.1 C
New York

Nawab Malik : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांचे जावई आणि मुलीच्या गाडीचा अपघात

Published:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून घरी परतत असताना हा अपघात झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून समीर खान यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nawab Malik daughter and son in law car accident in Kurla)

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे कुर्ल्यातील क्रिटीकेअर रुग्णालयातून घरी परत जात असताना हा अपघात घडला. समीर खान हे गाडीमध्ये बसता असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. समीर खान हे गाडीमध्ये बसत असताना गाडी चालकाकडून चुकून ब्रेकऐवजी ऍक्सिलेटर दाबल्याने समीर खान हे गाडीसोबत फरफटत गेले. त्यामुळे वाहन चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असल्याचे समोर आले. यामध्ये त्यांची थार ही गाडी समोरच उभ्या असलेल्या 2 ते 3 दुचाकींवर जाऊन आदळली असल्याचेही समोर आले.

या अपघातानंतर समीर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यादेखील त्यांच्यासोबत होत्या. त्यांनादेखील दुखापत झाली असून त्यांच्या हाताला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. विनोबा भावे पोलीस ठाण्यात याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असून या प्रकरणी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img