19.1 C
New York

Chandrakant Patil : पुण्यात तर्राट वाहनचालकाचा प्रताप; थेट चंद्रकांतदादांच्या गाडीलाच ठोकलं

Published:

कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणाच्या जखमा पुणेकरांच्या मनात ताज्या आहेत. त्यानंतरही पुण्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अपघातांना निमंत्रण देण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. (Chandrakant Patil ) आता तर सर्वसामान्य नागरिकच नाही, तर मंत्री आणि त्यांच्या गाड्याही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

काल रात्री बारा वाजताच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतून घडलेल्या अपघातामधून चंद्रकांत पाटील बालंबाल बचावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द चंद्रकांत दादांनीच याविषयी माहिती दिली. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार चालक, त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक हा अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर येत आहे.

चंद्रकांत पाटील यांची आरक्षणावर प्रतिक्रिया,म्हणाले

Chandrakant Patil चंद्रकांतदादांनी सांगितली घटना

देवदर्शन आणि गणपती मंडळांना भेटीगाठी दिल्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील कोथरुड भागात असलेल्या आपल्या घरी चाललो होतो. दरम्यान आशिष गार्डन जवळ रात्री बारा वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने आमच्या ताफ्यातील गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये मी थोडक्यात बचावलो. काही क्षणाचा अवधी होता. माझी गाडी थोडी पुढे गेली आणि मागे माझ्या ताफ्यातील गाडीला धडक बसली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img