13.2 C
New York

Bigg Boss Marathi : ‘आता आम्ही बिग बॉस बघणार नाही’; आर्या जाधवच्या एलिमिनेशनमुळे नेटकरी संतापले!

Published:

सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून बिग बॉसवर (Bigg Boss Marathi) बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. कालचा दिवस फक्त आर्यासाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठीही कालचा दिवस खूप वाईट होता. बिग बॉसच्या घरात निक्की आणि आर्याचं गेल्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमुळे कडाक्याचं भांडण झालं. वॉशरूम एरियामध्ये भांडणाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं.आर्याला काही वेळासाठी यामुळे जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. काल झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर घराबाहेर जाण्याची मोठी शिक्षा सुनावली आहे. आर्या जाधवला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतरची पहिली पोस्ट चर्चेत आली आहे.

आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर अवघ्या काही तासातच पहिली पोस्ट शेअर केली आहे. बिग बॉसने आर्याला शेअर केलेल्या पोस्टमध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड दिसतोय आणि त्यावर तुटलेलं हृदय दिसत आहे. सहाजिकचेय आर्याला तडका फडकी बाहेर काढल्यामुळे तिचं हृदय तुटल्याची भावना असावी. बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. तिला एकही संधी न देता किंवा तिला माफ न करता थेट बाहेर काढल्यामुळे नेटकरी बिग बॉस मराठीला आणि रितेश देशमुखला सुद्धा ट्रोल करीत आहेत. निक्कीला आणि अरबाजलाही घराबाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात होती.

Bigg Boss Marathi काय म्हणतायत प्रेक्षक?

सध्या सोशल मीडियावर आर्याला बाहेर काढल्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. कमेंट करत या व्हिडीओवर एकाने लिहिले की, ‘आर्याने जे केलं ते १००% बरोबरच केलं, कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडणं गरजेचं होतं. अख्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे.’ तर, ‘आर्यानी चुक केली, परत २ हाणायला पाहिजे होत्या’, ‘बंद करा शो बघायचं, निक्कीचा बिग बॉस चालू आहे’, ‘बाय बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस’, ‘आर्याला जर बाहेर काढलं बिग बॉस नंतर आम्ही बिग बॉस पाहणार नाही बिग बॉसने ही गोष्ट ध्यानात ठेवावी’, ‘निक्कीनं काय पण केलं तर चालतंय, पणं तेचं दुसऱ्याने केल्यावर चालतं नाही…’, ‘आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत, तरी तिला काय शिक्षा नाही’, ‘निक्की सगळ्यांची अक्कल काढते, तेव्हा कुठे असतात बिग बॉस? तेव्हा का तिला काही बोलत नाही?’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहेत.

‘आजपासून ‘बिग बॉस’ बघणं बंद… निक्कीला विनर बनवा आणि काय करायच ते करा.’, ‘अगं तू जिंकलीस’, ‘आर्या तू खूप छान खेळलीस. उलट तू चाहत्यांचं मन जिंकलंस… पण तू निक्कीच्या एक नाही दोन कानफाटात मारायला हवी होती’, ‘अच्छा बिग बॉस ने आर्याला घरातून बाहेर काढलं आता मी बिग बॉससला माझ्या घरातल्या टीव्हीतून बाहेर काढणार परमनंट’, ‘स्क्रिप्टेड बिग बॉस’ असं म्हणत बिग बॉसला ट्रोल केलं जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img