19.1 C
New York

ST Bus : नऊ वर्षांत पहिल्यांदाच एसटी बस सुसाट, ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा अधिक नफा

Published:

मागील अनेक वर्षांपासून एसटीची चाकं रुतलेली असल्याचं दिसून येत होतं. कोरोना काळानंतर एसटी (ST Bus) चांगलीच तोट्यात असल्याचं सांगितलं जात होतं. यंदाच्या उत्सवांमध्ये प्रवाशांनी एसटीच्या चाकांना त्यानंतर आता बळ दिल्याने 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये ऑगस्ट महिन्यात एसटीचे नफा झाला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिलीयं. यासंदर्भाती एक प्रसिद्धीपत्रकच जारी करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात होतं. अखेरीस 2015 साली एसटी फायद्यात आली होती खरी पण त्यानंतर कोरोना काळ अत्यंत वाईट गेल्याचं दिसून आलं. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यातच महाविकास आघाडीच्या काळात संप केल्याने एसटी महामंडळ अजूनच तोट्यात गेलं होतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मोफत प्रवास आणि महिलांसाठी अर्धे तिकीट आकारण्यात आलं. त्यानंतर रुतलेली एसटीची चाके पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसून आलंय.

महाराष्ट्राचा मूड काय? लाडकी बहिण योजनेचा महायुतीला किती फायदा..

दरम्यान, एसटी गणपती स्पेशल गाड्यांमुळे यंदा कोकणात दोन लाख चाकरमानी रवाना झाले. त्यानंतर आता परतीच्या प्रवास देखील एसटीला नव्या शिखरावर पोहचविणार आहे. साध्या टप्प्या टप्प्याने टु बाय टु आसनाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस देखील एसटी आता दाखल होणार आहेत. या बसेस लांबपल्ल्याच्या मार्गासाठी उत्तम ठरणार आहेत. त्यामुळे एसटी उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img