13.2 C
New York

Jitendra Awhad : ‘त्या’ फोटोंवरून फडणवीसांनी आव्हाडांना सुनावलं

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या निवासस्थानी गणेशपूजेसाठी हजेरी लावली. यावरून महायुतीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जोदरार प्रत्युत्तर दिलं. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे, असा पटलवार त्यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) प्रत्युत्तर दिलं. तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचा एक फोटो शेअर केला. त्यांनी लिहिलं की, सध्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहे. ते फोटो यासाठी व्हायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारण नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात.

‘हा’ फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

पुढं त्यांनी लिहिलं की, त्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात. त्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, सीताराम येचुरी असे अनेक नेते आजूबाजूला दिसतात. म्हणजे तो सार्वजनिक कार्यक्रम असला पाहिजे; ज्यामध्ये देशातील प्रमुख नेते आणि व्यक्तींना बोलावले गेलेले असेल. ही एकांतात किंवा घरात झालेली भेट नसून एका प्रांगणात झालेली भेट, असेच या भेटीचे वर्णण करता येईल. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad फडणवीस काय म्हणाले होते?

फडणवीस यांनी एक्सवर लिहिलं की, देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायची पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन देखील केलं. अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले,फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवत असतं, आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा सवाल फडणवीसांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img