19.1 C
New York

Maharashtra Politics : लोकसभेत शिंदे-अजितदादांना धक्का; शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख

Published:

आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्षांत फूट पडली. (Maharashtra Politics)  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दीड वर्षांनंतर अजित पवारही मुख्यमंत्री झाले. पक्ष आणि चिन्हांचा निकालही सत्तेतील दोन्ही गटांच्या बाजूने लागला. महायुतीची गाडी वेगाने पळू लागली. पण लोकसभा निवडणुकीत या गाडीला जोरदार ब्रेक लागला. युतीची मोठी पिछेहाट झाली. या घडामोडींनंत राजकारणाचा सारीपाट वेगाने बदलू लागला आहे. महायुतीत अजितदादांना धक्क्यांवर धक्के बसू लागले आहेत. शिंदे गटाचीही घुसमट वाढू लागली आहे. यातच या दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.

हा धक्का महाराष्ट्र्रात नाही तर थेट लोकसभेत बसला आहे. लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे. या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाच्या वादात मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं होतं. तुतारी वाजवणारा माणूस शरद पवार यांच्या गटाला पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिला. त्यांच्या गटाने आठ जागा जिंकल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली.

लोकसभा सचिवालयाने खासदारांच्या संख्येच्या आधारे राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप केलं. यामध्ये शरद पवार गटाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा न करता राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला तर कार्यालयही देण्यात आलेलं नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img