13.2 C
New York

Bigg Boss Marathi : वर्षा ताई अन् निक्कीची तू-तू, मैं-मैं संपेचना; आज भाजीवरुन भांडण

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season) आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे (GhanShyam Darwade) घराबाहेर गेला. तर या आठवड्यातही एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन (Nomination) कार्य पार पडलं. या आठवड्यात सूरज (Suraj Chavan) घराचा कॅप्टन असल्याने तो सेफ आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) नव्या प्रोमोमध्ये निक्की (Nikki Tamboli) आणि वर्षा ताईंमध्ये (Varsha Tai) भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,’इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे’. त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,’कारण मला ती खराब वाटली’. पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

आता 20 किलोमीटर बिनधास्त गाडी चालवा, कारण..

Bigg Boss Marathi अंकिताचा ‘हा’ मजेदार व्हिडीओ पाहिलात का?

बिग बॉस’च्या घरामध्ये प्रत्येक सदस्य गेम तर खेळतातच . पण त्याच सोबत आपली बॉडी देखील बनवताना दिसतात. आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’मध्ये, अंकिता सूरजला म्हणते की ,’हे बघ मला बेडकुळी आली मला. अरबाजला ढकलले आहे मी सोपे आहे का ? तुला पण ढकलीन थोड्या दिवसांनी आता तू पण सांभाळून राहा. त्यावर सुरज म्हणतोय की ,’ राहतो की सांभाळून… पण अरबाज आणि वैभवाची बॉडी पावडर खाऊन झाली आहे.

तेच पुढे अंकिताला DP दादा बोलवतात. तर अंकिताला म्हणते की ,’बेडकुळी आलेल्या माणसाला असे बोलावतात का?आदराने बोलवा मला. DP दादा आणि वैभव अंकिताला सेट मारायला सांगतात. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही अंकिताने कसे सेट मारले हे पाहू शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img