13.2 C
New York

Mumbaicha Dabewala : आता केरळच्या शाळांमध्ये शिकवला जाणार मुंबईच्या डबेवाल्यांचा धडा

Published:

मुंबईतील डब्बावाल्यांचा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. घराचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. इंग्लंडचा राजकुमार असो की काही देशांचे राष्ट्राध्यक्ष अनेक जण डब्बेवाल्यांमुळे प्रभावित झाले आहेत. आता त्यांचा धडा अभ्यासक्रमात आला आहे. डब्बावाल्यांचा धडा
इयत्ता 9 वीच्या अभ्यासक्रमात असेल.

Mumbaicha Dabewala केरळ सरकारचा मोठा निर्णय

केरळच्या इयत्ता 9 वीतील इंग्रजीच्या पुस्तकात द सागा ऑफ द टिफिन कॅरियर्स या नावाने हा पाठ असेल. या धड्याचे लेखक ह्युग आणि कोलीन गँटजर आहेत. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) 2024 साठी आताच्या अद्ययावत अभ्यासक्रमात डब्बेवाल्याच्या कथेचा समावेश आहे. या धड्यात डब्बेवाल्यांची सुरुवात कशी झाली. त्यांचे व्यवस्थापन याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbaicha Dabewala 130 वर्षांहून अधिकची सेवा

मुंबईत डब्बे पोहचवण्याचा हा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. गरमागरम डब्बा मुंबईकरांना डब्बेवाले घरातून त्याच्या कार्यालयात नेऊन पोहचवतात. त्यामुळे चाकरमान्यांची खाण्याची अबाळ होत नाही. त्यांना घराच्या जेवणाची लज्जत चाखता येते. या डिलिव्हरी सिस्टमची जगभरात ख्याती पसरली आहे. या कामाचे इंग्लंडचा राजा, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांनी पण तोंडभरून कौतुक केले आहे. मुंबईत सायकलवर एकाचवेळी अनेक डब्बे दिसतात. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना घरगुती जेवणाचा आनंद त्यांच्यामुळे मिळतो. विशेष म्हणजे या पद्धतीत डब्बा बदलल्याची तक्रार समोर येत नाही. त्यांचा व्यवस्थापनाची ही एक खास बाब आहे.

‘मला पंतप्रधान मोदी आवडतात’, अमेरिकेत राहुल गांधी यांचं वक्तव्य

Mumbaicha Dabewala रोज 2 लाख मुंबईकरांना पोहचतो डब्बा

मुंबईतील डब्बावाला संघटनेशी जवळपास 5 हजारांहून अधिक जण जोडल्या गेले आहेत. डब्बा पोहचवण्याचे काम ते जवळपास 2 लाखांहून अधिक जणांना करतात. 1890 मध्ये या डब्बे पोहचविण्याची सेवामहादु हावजी बचे यांनी सुरू केली होती. 100 ग्राहकांपर्यंत सुरूवातीला हे सेवा केवळ मर्यादीत होती. पण जस जसं शहरं वाढलं. डब्बा वितरणाची प्रणाली व्यापक झाली.

डब्बेवाल्यांचा खास पोशाख आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव असतो. जगातील अनेक मोठं-मोठ्या बिझनेस स्कूलने त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्यांच्यावर डॉक्युमेंट्रीज, पुस्तकं आणि कॉमिक बुक पण काढण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img