10 C
New York

Haryana Election : हरियाणात भाजपकडून मोठा निर्णय, विनेश फोगटविरोधात ‘कॅप्टन’ ला उमेदवारी जाहीर

Published:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election) आज सत्ताधारी भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपने 21 उमेदवारांना तिकीट दिले आहे. तर यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 67 उमेदवारांची घोषणा केली होती. 90 जागांवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत 88 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर आता फक्त दोन जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे आहेत.

दुसऱ्या यादीत भाजपने कॅप्टन योगेश बैरागी (Captain Yogesh Bairagi) यांना काँग्रेसचे उमेदवार आणि ऑलिम्पियन विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्या विरोधात जुलानामध्ये उतरवले आहे. तर नारायणगडमधून पवन सैनी आणि देवेंद्र कौशिक यांना गणौरमधून उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. तर पुंद्रीतून सतपाल जांबा, रायमधून कृष्णा गहलावत, असांधमधून योगेंद्र राणा, बडोद्यातून प्रदीप संगवान, नरवानामधून कृष्णकुमार बेदी, डबवलीतून बलदेव सिंग मंगियाना, रोहतकमधून मनीष ग्रोवर, एलेनाबादमधून अमीर चंद मेहता, कृष्णा गेहलावत यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

‘मी राष्ट्रवादीतच..’, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

नारनौलमधून ओम प्रकाश यादव, बावलमधून कृष्ण कुमार, पतौडीमधून बिमला चौधरी, फिरोजपूरमधून बडखलहून अधलाखा, झिरकामधून नसीम अहमद, पुन्हानमधून एजाज खान, नूहमधून संजय सिंह, हातीनमधून मनोज रावत, होडलमधून हरिंदर सिंग रामरतन, धनेश यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हरियाणात 05 ऑक्टोबर रोजी विधानसभेचे सर्व 90 जागांवर मतदान होणार आहे तर 08 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img