विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर राज्य सरकारने (State Govt) कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याची माहिती दिली. कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील महावितरण (Mahavitaran), महापारेषण (Mahapareshan) आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
सह्याद्री अतिगृहावर महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटनेच्या कृती समितीसमेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठती झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 19 टक्के पगारवाढ दिली आहे. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीज कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन मिळणार आहे. ही वाढ मार्च 2024 पासून लागू होणार आहे. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख यांची उपस्थिती होती. धनंजय मुंडे ऑनलाइन उपस्थित होते.
विशेष म्हणजे पहिली पगार वाढही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार कऱण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे मनपाचे अधिकारी रडारवर, 6 जणांची होणार चौकशी
Devendra Fadnavis कामगारांच्या कोणत्या मागण्या मान्य?
-महानिर्मिती कंपनीतील तिन्ही वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ.
-मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मितीच्या सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार, नोकरीमध्ये सुरक्षेची हमी, कोणत्याही कंत्राटी कामगारांना काढणार नाही, असं परिपत्रक देण्याची मागणी मान्य.
-महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय लाभ देण्यासाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी.
– महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येकी पाच वर्षांसाठी पाच गुण असे 25 अतिरिक्त गुण देण्यात यावेत व वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात यावी.
-महानिर्मिती कंपनीचा लोगो नवीन स्टाइलचा असावा आणि जुन्या स्टाइलचा गेट पास सुरू ठेवावा आणि कंत्राटदाराने नमूद केलेल्या गटेपास रद्द कराव्यात.