21.7 C
New York

Deepika Padukone : दीपिका आणि रणवीर आपल्या लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार?

Published:

Deepika Padukone : नुकतीच रणवीर आणि दीपिका यांनी काल प्रसारमाध्यमांवर आपलयाला मुलगी झाली असल्याची गोड बातमी जाहीर केली. गणेशशोत्वाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे सर्वीकडून त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव होत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या तब्बल ६ वर्षांनी या जोडप्यांनी गोड बातमी दिली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रेटींनी या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता दीपिकार-रणवीर त्यांच्या आता लाडक्या लेकीचं नाव काय ठेवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलाय. आई-वडिलांचा नवा जोडून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या मुलांचं नाव ठेवलं आहे.

हे जोडपंही तोच ट्रेंड फॉलो करणार का ? 8 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी छोट्या परीचे स्वागत केले. दीपिका-रणवीर नव्या पाहुण्यामुळे अतिशय आनंदित झालेले दिसत आहेत. लाखो चाहत्यांनी देखील या दोघांचे अभिनंदन करत त्यांच्या लाडक्या लेकीला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मुलीची पहिली झलक रणवीर आणि दीपिका कधी शेअर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलाय. दीपिका-रणवीरने जेव्हापासून ही गुड न्यूज दिली आहे, तेव्हापासूनच सोशल मीडियावर त्या दोघांना टॅग करत शुभेच्छाही दिल्यात. मात्र लाडक्या लेकीचं नाव काय ठेवणार असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. तर त्यांच्या मुलीसाठी काही लोकांनी थोडी वेगळी, अनोखी नावंही सुचवली आहेत.

मित्रानेही साथ सोडली… मालेगावात भुसे टेन्शनमध्ये

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी गेल्या काही काळापासून एक वेगळा ट्रेंड फॉलो करत आहेत. आई-वडिलांच्या नावातील काही अक्षर जोडून सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचं नाव ठेवत आहेत. शाहिद आणि मीरा कपूर, अभिनेत्री अनुष्का शर्मा – विराट कोहली,यांनीही असंच काहीसं केलं होतं. तर काही सेलिब्रिटींनी मात्र तो ट्रेंड फॉलो न करता देवाच्या नावाने मुलांचं नाव ठेवलं.पण काही सेलिब्रेटी इतक अनोखं नाव निवडतात ज्याचा कोणीच विचारही करू शकत नाहीत. पण त्या नावाचा अर्थ देखील मोठा असतो. रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनीही त्यांच्या मुलीचं असंच युनिक, राहा हे नाव ठेवलं. तर नुकतीच आई झालेली दीपिका अनुष्का शर्मा किंवा आलिया याना फॉलो करणार का ? तसेच तिच्या मुलीच नाव काय ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img