19.1 C
New York

Jawhar : जव्हार तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व मुख्यमंत्री शाळेचा सन्मान

Published:

संदीप साळवे,पालघर

पालघर: पंचायत समिती जव्हार अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक व मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमातील पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी २ वाजता शहरातील घाची हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विजया लहारे ,प्रमुख पाहुणे विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा, उपसभापती दिलीप पाडवी ,पालघर जिल्हा परिषद सदस्या सुरेखा थेतले, गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते , गटशिक्षणाधिकारी पुंडलिक चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


जव्हार सारख्या दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत जव्हार तालुक्यातून कुंभारकांड जिल्हा परिषद शाळेतील विष्णू पिलाना,विनवळ जिल्हा परिषद शाळेतील यशवंत गावित, मोकाशी पाडा जिल्हा परिषद शाळेतील प्रवीण गावित,पिंपळशेत जिल्हा परिषद शाळेतील अरुण राजकवर, मेढा जिल्हा परिषद शाळा नेहा खाडे, धोंडपाडा जिल्हा परिषद शाळा जयराम दोडके, कळमविहिरा जिल्हा परिषद शाळा सुवर्णा भोर, खोरीपाडा जिल्हा परिषद शाळा संतू कांबळे अशा एकूण आठ शिक्षकांना तसेच काळी धोंड जिल्हा परिषद शाळेच्या दर्शना मुकणे यांचा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार


या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी पुरस्कार सोहळा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.आमदार सुनील भुसारा यांनी बालपनातील शाळेतील आठवणींना उजाळा देऊन सर्व शिक्षकांना उपयुक्त मार्गदर्शन केले यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम (राज्यमंत्री दर्जा) यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थित सर्व शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात शिक्षण विभागामार्फत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातून जिल्हा परिषद शाळेतून काळीधोंड या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठण शाळेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तर जिल्हा परिषद शाळा शिरोशी या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.


दरम्यान, खाजगी व्यवस्थापन पद्धतीत विशेष बालकांची दिव्य विद्यालय शाळेला प्रथम क्रमांक, निलेश्वर मुर्डेश्वर विद्यालय जव्हार यांना द्वितीय क्रमांक तसेच युनिवर्सल स्कूल जव्हार यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. उपस्थित मान्यवरांनी या सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी पुंडलिक चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन व आभार रवी बुधर व दर्शना मुकणे यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img