वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून पद मिळवल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय आयोगाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच आता पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली. पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) अधिकारी रडारवर आलेत. बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळणाऱ्या सहाही अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करावे, असे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी मनपा आयुक्तांना दिलेत.
Pooja Khedkar बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 6 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्यीची शक्यता आहे.
शासनाने दिव्यांगांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांचा फायदा लाटण्यासाठी अनेकजण दिव्यांग बनून बोगस प्रमाणपत्र मिळवत आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकऱ्या देखील मिळवल्यात. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत अनेकांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळाल्याची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्तांना प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून ज्या अभियंत्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले, त्यांच्याविरुद्ध चौकशीची कार्यवाही करावी, असा प्रस्ताव सादर केला.
या पत्रात लिहिलं की, पुणे महानगरपालिकेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून स्थापत्य अभियंता पदावर काहींना नोकरी मिळवली. तरी त्यांची शारिरीक फेरतपासणी करून अनैतिक पद्धतीने प्राप्त केलेले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करावे. तसेच संबंधित व्यक्तींनी व दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय डॉक्टर यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे निर्देश दिलेत. या तक्रारीमध्ये अस्थिव्यंग प्रमाणपत्राच्या 2, अल्पदुष्टी प्रमाणपत्राच्या 3 आणि कर्णबधीर प्रमाणपत्राबाबत 1 तक्रार प्राप्त झाली.
आता अजितदादाच शिवतारेंना पुन्हा ‘आमदार’ करणार?
Pooja Khedkar बोगस प्रमाणपत्र सादक करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी-
- वाडेकर मकरंद उत्तमराव – उपअभियंता – अस्थिव्यंग
- परदेशी अजय धनराज – शाखा अभियंता – अस्थिव्यंग
- निखील नानासाहेब रंधवे – शाखा अभियंता – अल्पदृष्टी
- सुनीलकुमर दत्तात्रय कोनमारे – शाखा अभियंता- अल्पदृष्टी
- गोपाल रामदास भोयर – शाखा अभियंता – कर्णबधीर
- धनराज गीते – कनिष्ठ अभियंता – अल्पदृष्टी