19.1 C
New York

 Dhananjay Munde : मराठवाड्यात राजकीय भूकंप! धनंजय मुंडेंनी भल्या पहाटे घेतली जरांगेंची भेट

Published:

राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत भेट घेतली. सरपंचांच्या घरी वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तुमची भेट घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते आले होते. त्यावेळी मी झोपेतच होतो. भेट झाली. आम्हा दोघांत साधारण वीस मिनिटे चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आंतरवालीत कुणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला कोणतीच तयारी करण्याची गरज नाही. आता त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी आमची तयारी आहे.

महाराष्ट्र दुर्बळ करण्याचे अमित शहांचे स्वप्न, संजय राऊतांचे टीकास्त्र

मी माझ्या मागणीवर आजही ठाम आहे. जीवात जीव असेपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अन् तेही ओबीसीतूनच मिळावं यावर ठाम असणार आहे. आमची आरक्षणाबाबत चर्चा झाली तेव्हा धनंजय मुंडे देखील व्यासपीठावर होते. आता आमची घोंगडी बैठक परळीत होणार असून ही बैठक मोठ्या ताकदीने होणार आहे. मी महाविकास आघाडी आणि महायुती कुणाचाच नाही. मी फक्त मराठ्यांचा आहे, असे जरांगे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

 Dhananjay Munde  महायुती सरकारची सावध रणनीती

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता. राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. आता विधानसभेलाही याचा फटका बसू शकतो याची जाणीव असल्याने महायुती सरकारने मराठा आंदोलकांचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री मुंडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img