सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते (CBI) असताना त्यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारी वकील प्रविण चव्हाण, कट कारस्थान करण्याचा गुन्हा पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्याविरुद्धदाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विधीमंडळात केला होता. त्यावेळी त्यांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात बसवलेल्या घड्याळात कॅमेर्यातून हे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आलं होतं. याचा तपास शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
मराठवाड्यात राजकीय भूकंप! धनंजय मुंडेंनी भल्या पहाटे घेतली जरांगेंची भेट
या व्हिडिओ रेकॉर्डिगमध्ये विशेष सरकारी वकील कट रचताना व भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांना गुन्ह्यामध्ये अडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी बोलताना दिसून येतात. प्रविण चव्हाण हे अर्जदार आणि भाजपच्या इतर नेत्यांवर खोट्या तक्रारी तयार करणे, साक्षीदारांना शिकवणे, रोख रक्कमेची व्यवस्था करणं, तपास अधिकार्यांना सूचना देणं इत्यादी अगदी पहिल्या टप्प्यापासून खोटे गुन्हे दाखल करण्यात गुंतलेले आहेत.
चाकू लपवणं, छापा कसा टाकायचा, ड्रग व्यवसाय कसा दाखवायचा, केस कशी मोक्कामध्ये बसवायची, हे सांगताना प्रविण चव्हाण दिसून येतात. छापा टाकायला गेलेल्या पथकाचे हॉटेल बुकिंग करणे आणि त्याचे बिले भरली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. गुन्हेगारी कट रचण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विजय पाटील, तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या सोबत खटल्यात भाजप नेते आणि इतरांना गुंतविण्यासाठी खोटे साक्षीदार व पुरावे बनविले असल्याचे या एफआरआयमध्ये म्हटले आहे.