21.7 C
New York

Ganesh Festival 2024 : यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा; गणरायाचं जल्लोषात होतंय स्वागत..

Published:

लाडक्या बाप्पाच्या स्वागताचे वेध महाराष्ट्राला लागले (Ganesh Festival 2024) आहेत. आज शनिवारी गणरायाचं मोठ्या उत्साहात घराघरात आगमन होईल. त्याच्याच आगमनाची प्रत्येकाची तयारी आता पूर्ण झाली आहे. सार्वजनिक मंडळेही गणेशाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत बाप्पांचे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मंडळात आगमन झाले. आज याचनिमित्ताने गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त कसा आहे याची माहिती घेऊ या..

Ganesh Festival 2024 गणेश व्रत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

आज घराघरात गणरायाचं मोठ्या उत्साहात (Ganesh Chaturthi 2024) आणि वाजतगाजत आगमन होणार आहे. गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त पहाटे 4.50 वाजल्यापासूनच सुरू होतो. मुख्य चतुर्थी तिथी महत्वाची असल्याने सायंकाळपर्यंत गणेश प्रतिष्ठापना करता येणार आहे. शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे 4.51 ते दुपारी 1.51 पर्यंत श्रींची प्राणप्रतिष्ठा करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दुपारनंतरही श्रींची प्राणप्रतिष्ठा करता येईल. श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करताना विशिष्ट नक्षत्र, योग, विशिष्ट करण तसेच राहुकाल आदी वर्ज्य नाहीत.

Ganesh Festival 2024 यंदा गणेशोत्सव अकरा दिवसांचा

यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा राहणार आहे. आज 7 सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होईल. अनंत चतुदर्शी 17 सप्टेंबरला आहे. म्हणजेच गणरायाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणखी एक दिवस मिळणार आहे. गणेश मंडळांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईचा राजाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच येथे दर्शनाला सुरुवात झाली आहे. भल्या सकाळीच भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. मंडळाचं यंदाचं 97 वं वर्ष आहे. यंदा मंडळाने उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा तयार केला आहे. हा देखावा लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने गणरायाच्या आगमनाची खास तयारी केली आहे. सिंह रथातून गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक निघणार आहे. या सिंह रथाला मनमोहक आरास करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता गणरायाची मूर्ती मंदिराबाहेर निघेल. जटोली शिव मंदिरात दगडू शेठ बाप्पा विराजमान होणार आहेत. आज राज्यातील मोठ्या शहरांत गणरायाच्या स्वागत मिरवणुका निघण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img