13.2 C
New York

Pune : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई

Published:

Pune : ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमी वरती पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेतांवर आता करडी नजर ठेवली आहे. पुण्यातील कोंढव्यात छापा टाकून अमली पदार्थ विरोधी पथकाने 40 लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. समीर शरीफ शेख याच्याकडे कोंढव्यातील भाग्योदय नगर परिसरात मेफेड्रोन असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांना मिळाली. त्यानंतर समीर शेख याच्या घरावरती पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. जवळपास 40 लाख रुपयांचे 202 ग्रॅम मेफेड्रोन, मोबाईल संच, देशी बनावटीचे पिस्तूल जवळपास असा 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तसंच सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संदीप शिर्के, प्रवीण उतेकर, दयानंद तेलंगे पाटील, योगेश मोहिते, विपुल गायकवाड, संदेश काकडे, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली.

धावत्या रेल्वेतील बाप्पाला यंदा ब्रेक, रेल्वेच्या निर्णयाविरोधात चाकरमान्यांच्या संताप

गांजा विक्री प्रकरणी तिघे अटकेत

बिबवेवाडी भागातील चैत्रबन सोसायटी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. आयुष अनंत शिंदे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या आकाश राजू घाेरपडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७०५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. घोरपडेचा साथीदार धनंजय दशरथ पवार याला अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img