10 C
New York

Godavari Express Ganesh Utsav:धावत्या रेल्वेतील बाप्पाला यंदा ब्रेक, रेल्वेच्या निर्णयाविरोधात चाकरमान्यांचा संताप

Published:

Godavari Express Ganesh Utsav: आज गणरायाचे देशभरात घरोघरी आगमन झाले. बच्चे कंपनीसह सर्वच गटातल्या लोकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचे जल्लोषच स्वागत केले. परंतु 28 वर्षांपासून सुरू असलेली मनमाड – नाशिककरांची परंपरा खंडित झाली आहे. गोदावरी एक्सप्रेस मध्ये यंदा गोदावरीचा राजा बसवण्यात आला नाहीये. रेल्वे प्रशासनाने पाच धारकांच्या बोगीमध्ये विराजमान होणाऱ्या बाप्पा यंदा बसवण्यास विरोध केलाय. त्यामुळेच ही परंपरा खंडित झाली. तसंच चाकरमान्यांनीही मनमाड मध्ये रेल्वे स्थानकावर जमत प्रशासनाचा निषेध करत संताप व्यक्त केला

रेल्वे प्रवासी संघटने कडून स्थापना
अनेक जणांना गणेशोत्सवात सुट्टी नसते. त्यामुळे नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी गोदावरी एक्सप्रेस मध्ये रेल्वेतील एका डब्यात गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली. गेल्या 28 वर्षांपासून मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस मध्ये ही परंपरा सुरू होती. गोदावरीचा राजा ट्रस्ट व रेल्वे प्रवासी संघटना यांच्यातर्फे दरवर्षी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात होती. परंतु यंदा रेल्वे प्रशासनाने धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास विरोध केला. त्यामुळे गणरायाचा धावत्या गोदावरी एक्सप्रेस मधील प्रवास यंदापासून थांबणार आहे.

आदिवासींच्या हातांना गणेशोत्सवात रोजगार

दहा दिवस चाकरमान्यांकडून होत होती गणरायाची सेवा

नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी गोदावरी एक्सप्रेस ही गाडी होती. तिला पुढे धुळ्यापर्यंत वाढवण्यात आली. मनमाड वरून धुळे या वाढलेल्या टप्प्यासाठी चाकरमानी विरोध करत होते. परंतु ही गाडी रेल्वे प्रवाशांचा विरोध डावलून धुळ्यापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर आता लासलगाव मनमाड आणि नाशिक मधील चाकरमानी या गोदावरी एक्सप्रेस मध्ये गणपती बाप्पा बसवत होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गाडीच्या पासबोगीत विधिवत गणरायाची स्थापना केली जात होती. आणि अनंत चतुर्दशीला या गणपती बाप्पाचा विसर्जन देखील केले जात होते. दहा दिवस मनोभावे चाकरमानी गणपती बाप्पाची पूजा आरती करत होते. परंतु यावर्षीपासून एक्सप्रेस मध्ये गणराया नसणार आहे त्यामुळे, रेल्वे प्रदर्शन मधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img