10 C
New York

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का?, फडणवीस म्हणाले

Published:

महयुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एकनाथ शिंदे आहेत का? या प्रश्नावर थेट नाही असं उत्तर दिलं नसल तरी ते पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल असं म्हणत शिंदे यांचं नाव घेण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळाटाळ केली आहे. तसंच, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आमची नैसर्गिक युती होती. (Devendra Fadnavis ) हिंदुत्वाची मतं एकत्रित राहिल्याने फायदा झाला. ते तिकडे गेल्याने मतेही गेली. नुकसानही झालं. आता ती मतं येत आहेत. त्यांनी लांगूलचालन केलं. ते राजकारण त्यांनी स्वीकारलं असं अशा शब्दांत फडणवीसांनी युतीवर भाष्य केलं.

Devendra Fadnavis पार्लमेंट्री बोर्ड ठरवणार

आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही एकत्र जात आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या गोष्टी आमच्या लेव्हलला ठरत नसतात. ती पार्लमेंट्री बोर्डात चर्चा होते. शिंदेंशी बोर्डाची चर्चा झाली असेल. आमचं पार्लमेंट्री बोर्ड, शिंदे आणि अजितदादा हे एकत्र बसून निर्णय घेतील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

जयदीप आपटेला राऊतांनीच लपवलं होतं; फडणवीसांनीही लगावला खोचक टोला

मै अपने आपको गौरवान्वित महसूस करता हूँ हिंदीत म्हणतात, अशी माझी स्थिती आहे. जेवताना, उठताना झोपतानाही विरोधकांना मी दिसतो. माझ्याशिवाय त्यांना काही दिसत नाही. त्यांना ठरवलंय फडणवीस यांना टार्गेट करायचं. राज्यातील जनतेला त्यांनी काही केलं तरी माहीत आहे, माझी इमेज काय आहे. काही मते काढण्याचा त्यांनी कितीही दुषण दिली तरी त्यांचा प्रयत्न आहे. माझ्यावर रोज त्यांना आरोप करून विकासाचे मुद्दे बाजूला सारायचे आहेत. ते मला किती मोठा नेता मानतात हे त्यातून स्पष्ट होतं असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img