7.2 C
New York

Assembly Election : राज्याचं भवितव्य तरुणांच्याच हाती; विधानसभेसाठी मतदारांची आकडेवारी जाहीर

Published:

संपूर्ण राज्याचे लक्ष लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) विधानसभा निवडणुकीकडे (Assembly Election) लागले आहे. तब्बल 9 कोटी 50 लाख मतदार मतदानाचा हक्क या विधानसभा निवडणुकीत बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीयं, तर पहिल्यांदाच मतदान यापैकी 2 टक्के मतदार करणार आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीत 4 कोटी 90 लाख पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 4 कोटी 60 लाख महिला मतदार देखील यावेळी मतदान करणार आहेत. तर यावेळी 16 लाख 90 हजार 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या आहे. त्यामुळे राज्याचं भवितव्य 2024 विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या हातात असणार आहे. 9 कोटी 25 लाख गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारांची संख्या होती.

राज्यात दर 1000 पुरुष मतदारांमागे 933 महिला मतदार आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या 925 होती, म्हणजेच यावेळी निवडणुकीत महिला मतदार संख्येत 8 ने वाढ झाली आहे. महिला मतदारांची संख्या वाढण्यामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे. दुसरीकडे राज्यातील 5 जिल्हे असे आहेत. जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोदिया, भंडारा आहेत. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त 8.1 लाख मतदार आहेत. राज्यात 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार आहेत.

राज्य पोलीस दलातील 25 अधिकार्‍यांच्या बदल्या

तर 20 ते 30 वयोगटातील 1 कोटी 80 लाख मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18.60 हजारांपेक्षा जास्त आहे. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी 60.36 टक्के होती आणि 2019 मध्ये ती 61.44 टक्के इतकी होती. 11 निवडणुका दरम्यान, झाल्या, पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62 इतके मतदान झाले. तसेच 1995 वगळता राज्यात 71.69 टक्के मतदान झाले होते. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते. आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे. पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही, तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे. दरम्यान, केंद्रशासित प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये, मतदानाची टक्केवारी सुमारे 80 टक्के आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त 61 टक्के नाव नोंदवतात, हे योग्य नाही. राज्याचा देशाचा विकास जर तुम्हाला हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img