11 C
New York

Vadhavan Port Project : निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार

Published:

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections 2024) होणार आहे. या निवडणुकांची तयारीने वेग घेतला आहे. त्यातच राज्य आणि केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी अनेक (Maharashtra) प्रकल्प आणि योजनांना मंजुरी दिली जात आहे. या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट (Vadhavan Port Project) अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील. या प्रकल्पात दहा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करून विकसित केला जात आहे. या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे मंत्री सोनोवाल यांनी सांगितले.

पालघर येथील वाढवण बंदर प्रकल्पाच्या शिलान्यास समारंभाती मंत्री सोनोवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जगभरात एक सागरी राष्ट्र म्हणून नाव कमावले आहे. मागील दहा वर्षांच्या काळात सरकारने सागरी क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.

पीएम मोदींनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. तसेच यावेळी पालघरमध्ये 1560 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या 218 मत्स्यपालन योजनांचे देखील उद्घाटन मोदींनी केले होते. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये तीन दिवसांच्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा शुक्रवारी समारोप झाला. मुंबईपासून साधारण दीडशे किलोमीटर दू्र प्रत्येक ऋतूत चालणाऱ्या या योजनेला जून महिन्यात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. यामध्ये तब्बल 76 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img