11 C
New York

Jaydeep Apte : जयदीप आपटेला पकडलं नाही, सरेंडर केलं, वकिलाचा दावा

Published:

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्यावर ताब्यात घेतल्याचा पोलिसांचा दावा जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी फेटाळला असून निराधार असल्याचे म्हटले आहे. जयदीप आपटेने आत्मसमर्पण केले आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.

Jaydeep Apte जयदीप आपटेचे वकील काय म्हणाले?

अटकपूर्व जामिनाला न जाता स्वतःहून सरेंडर होणे पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजले. त्यामुळे त्याच हिशोबाने कुटुंबांशी चर्चा करून आज सरेंडर करायचा निर्णय कालच निर्णय झाला होता. बाजारपेठ पोलिसांकडे येईल स्वतःला सरेंडर करेल पुढील न्याय प्रक्रिया होईल असे आजच ठरले होते त्यानुसार हे घडले आहे. जी चुकीची स्टोरी सांगितली जाते तो अंधारामध्ये लपत कुटुंबाला भेटण्यासाठी ते सर्व साफ खोटे आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणे त्याच्यावर झालेले आरोप हे कसे निराधार आहेत हे सांगण्यासाठी तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरे जाणार आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला अटक

मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला (Jayadeep Apte) पोलिसांनी अटक केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केली. जयदीपच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता हा जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात आला तरी कसा याचीही माहिती समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी आल होता. याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

जयदीप आपटे या घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विरोधकांकडून मात्र राज्य सरकारला धारेवर धरले जात होते. राज्य सरकारनेच जयदीपला लपवून ठेवल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहिमेला गती दिली होती. या घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पोलिसांनी तिथे जाऊन जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर जयदीपचे कुटुंबीय पुन्हा कल्याणला आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img