17.6 C
New York

Bigg Boss Marathi : डिपी दादांची नाराजी; बदलणार टीम B च्या खेळाचे इक्वेशन?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली असून (Bigg Boss Marathi New Season ) आज 40 वा दिवस आहे. (Bigg Boss Marathi ) गेल्या 40 दिवसांपासून सर्वच सदस्य प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. (Bigg Boss Marathi New Promo) पण आता 40 दिवसांनंतर घरातील इक्वेशन बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डीपी दादांची (DP Dada) नाराज बदलणार का टीम B च्या खेळाचे इक्वेशन हे आता पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) डीपी दादा आणि अंकिता (Ankita) संभाषण करताना दिसत आहेत. डीपी दादा म्हणत आहेत,’अती बोलल्याने किंमत शून्य झाली आहे एवढचं आहे. ग्रुपमध्ये कधी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही’. त्यावर अंकिता डीपी दादा ग्रुप सोडायचाय का विचारते. यावर डीपी दादा होकार देतात. त्यानंतर अंकिता यासंदर्भात पॅडी दादांना सांगताना दिसून येते. पॅडी दादा म्हणतात,’ग्रुपवर अविश्वास दाखवताय तुम्ही. मुळात चुकलंय काय?”. त्यावर अंकिता म्हणते,”ते जे फील करतात ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे सगळे इक्वेशन बदलतील’.

Bigg Boss Marathi ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरू आहे गुपचूप टास्कची प्लॅनिंग

‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुपचूप टास्कची प्लॅनिंग सुरू आहे. कोणी प्रॉमिस देतंय तर कोणी नाटक करताना दिसून येत आहे. निक्कीने आणि घन:श्याम आणि अंकिता, वर्षा ताई, अभिजीत टास्क जिंकण्यासाठी गुपचूप जोरदार प्लॅनिंग करताना आजच्या भागात दिसून येणार आहेत. त्यामुळे कोण टास्क जिंकणार आणि कोण हरणार हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img