24.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘तुला थोडी तरी लाज असेल तर…’; जान्हवी निक्कीवर भडकली

Published:

सध्या चांगलाच ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi ) चर्चेत आहे. घरातील (Bigg Boss Marathi ) स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. आता आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज भांड्याला भांड लागणार आहे. निक्की (Nikki) आणि जान्हवीमध्ये (Janhvi) जेवण बनवण्यावरून मोठा वाद होणार आहे. निक्कीने घरातील ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला आहे.

बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणत आहे,”तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी जेवण बनवलेलं तू जेवणार नाहीस.” तर निक्की म्हणत आहे,”माझ्या वाकड्यात गेलं तर मी गळाच पकडत असते”. निक्की आणि जान्हवी आज काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आजचा भाग पाहायला अजिबात विसरू नका.

Bigg Boss Marathi BB फार्ममध्ये सदस्यांचा जोरदार राडा

सहाव्या आठवड्याची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा रसिकांचं मात्र मनोरंजन करेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img