15.6 C
New York

Jawhar : के.व्ही.हायस्कूलमध्ये 25 विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

Published:

जितेंद्र पाटील, डहाणू

जव्हार: (Jawhar) जव्हार सारख्या आदिवासी आणि दुर्गम तालुक्यात गेल्या पाच दशकांपासून विद्यादानाचे काम हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के.व्ही.हायस्कूल व आर.वाय. ज्युनिअर कॉलेज,जव्हार यांच्या विद्यमाने सुरू आहे, यात भर म्हणून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत, दरम्यान या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना काही दात्यांच्या मदतीने २५ सायकल मोफत वाटप करण्यात आल्या आहेत.


राजेश रसिकलाल शाह, मितेश रसिकलाल शाह यांच्या रावजी फाईन फ्राग्रान्सस – जिओ रोटी घर सायन,मुंबई व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन, मुंबई यांच्यातर्फे या सायकली वितरीत करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आजच्या काळातील स्वार्थी व संवेदनाशून्य जगात जिओ रोटी घर व सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे रसिकलाल व मिहीर शहा बंधू व ईशा नाईक हे दानशूर दाते गरजवंत व गरीबांचे कैवारी – आशेचे किरण होवून जगासमोर येतात हे आशादायक चित्र म्हणावे लागेल असे विद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी सांगितले

जुनी जव्हार ग्रामपंचायतचा उपक्रम ठरतोय दिलासादायक


या कार्यक्रमाला जव्हारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी करिश्मा नायर (आय. ए.एस .) सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन च्या संस्थापक , ईशा नाईक, प्रसिद्ध हिंदी मालिका अभिनेत्री कुस्मिता तिवारी , व सहकारी बिंटू रावत , पालक शिक्षक संघाच्या सहसचिव प्रीती पाटील प्रा .खटाळे उपस्थित होते . समारंभाचे अध्यक्ष व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार केंद्राचे शाखा सचिव प्रिं. डॉ . मनोहर मेश्राम यांच्या हस्ते मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वैभव खंडागळे यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक महाले यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img