महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पााच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लगबग सुरु आहे. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. मुंबईसह अन्य शहरांमधील हजारो चाकरमनी यासाठी दरवर्षी गणपती उत्सवाच्या (Ganpati Utsav 2024) काळात कोकणातील आपापल्या गावी जातात. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2024) तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी (St Employees Strike) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात जाण्यासाठी गणपतीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल.
लालपरीला ब्रेक! एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात
St Employees Strike काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
St Employees Strike गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद
अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे 4200 गट आरक्षणासह एकूण 4953 जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांसाठी गणपती उत्सवाला कोकणात जाण्याकरिता अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 3 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.