17.6 C
New York

Samarjeet Singh Ghatge : भाजपला कोल्हापुरी धक्का, समरजितसिंह घाटगे यांचं ठरलंच!

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींचा वेग वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठे धक्के दिले आहेत. आतापर्यंत ज्या नेत्यांची पक्ष प्रवेशाची फक्त चर्चा सुरू होती. त्या नेत्यांनी आता प्रत्यक्षात तुतारी हाती घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. या नव्या राजकीय घडामोडीची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याच दिवशी सायंकाळी कागल शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी ही माहिती दिली.

भाजप नेते समरजित घाटगे यांनी (Samarjeet Singh Ghatge) काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांनाच पुढील भूमिका काय ठरवायची असा प्रश्न विचारला होता. त्यावर कार्यकर्त्यांनी आता तुतारी हाती घ्या असे सांगितले होते. समरजितसिंह घाटगे यांनी त्यावेळीच राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी नोंदणी कधीपर्यंत? आदिती तटकरे म्हणाल्या

घाटगे यांच्या प्रवेशाआधी कागलमध्ये मोठे बॅनर लावण्यात आले आहे. वस्ताद येत आहे.. असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. कागलमधील केबी चौकात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याच चौकात मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर आहे. मुश्रीफांच्या अनेक सभा याच चौकातील मैदानावर होतात. त्यामुळे याच मैदानात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेऊन पवारांनी मोठा राजकीय संदेश देण्याचं काम केलं आहे. याच ठिकाणी पक्ष प्रवेशाची जाहीर सभा घेण्याचं आधीच निश्चित करण्यात आलं होतं.

Samarjeet Singh Ghatge महायुतीतली गणितं बिघडली

सन 2016 मध्ये समरजित घाटगे यांनी भाजपात प्रवेश केला होता. 2019 मध्ये मात्र ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे समरजित घाटगे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला होता. यंदा भाजप आपल्याला तिकीट देईल अशी त्यांची इच्छा होती. मात्र ही शक्यता अजित पवार यांच्यामुळे कठीण होऊन बसली. काही दिवसांपूर्वी अजित पवार कागलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कागलमधून हसन मुश्रीफांची उमेदवारीच जाहीर करून टाकली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे अशा परिस्थितीत जागा भाजपला मिळणंही कठीणच आहे. राजकीय गणितं आपल्याला अनुकूल नाहीत याचा अंदाज आल्याने समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img