15.6 C
New York

Chirag Paswan : चुकीला माफी नाही! चक्क केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर कारवाई; बिहारमध्ये काय घडलं?

Published:

वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही (Traffic Rules) म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, आर्थिक दंड केला अशा बातम्या नेहमीच येतात. सर्वसामान्य वाहनचालकांवर कारवाईच्या बातम्याही तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील पण चक्क केंद्रीय मंत्र्यावरच अशी कारवाई झाली तर.. ऐकायला खरं वाटत नाही पण हे खरं आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या वाहनाचं चलन कटल आहे. ओव्हर स्पीडिंगमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

परिवहन विभागाने नुकतीच E-Detection System सुरू केली आहे. या सिस्टीममुळे आपोआप चलन कट होते. 18 ऑगस्टपासून सुरू झालेल्या चिराग पासवान यांच्या वाहनाचे चलन त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवण्यात आले आहे. चिराग पासवान बिहारमधील (Bihar News) हाजीपुर येथून चंपारण येथे जात असताना ही घटना घडली. सध्या याच घटनेची जोरदार चर्चा होत आहे. चिराग पासवान यांची गाडी एका टोल नाक्यावर E Detection सिस्टीमच्या नजरेत आली. त्यांच्या वाहनाचा स्पीड ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले यानंतर सिस्टीममुळे आपोआप चलन तयार झाले आणि त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आले. या घटनेनंतर परिवहन विभागात खळबळ उडाली. यावर स्पष्टीकरण देताना अधिकारी म्हणाले की ही सिस्टीम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. जर नियमाच उल्लंघन झालं तर कुणाचीही गाडी असो त्यावर कारवाई होणार. यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की वाहनाच्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल किंवा गाडी जास्त वेगात असल्याचे आढळून आल्यास त्या गाडीचे चलन आपोआप तयार होते.

भाजपला कोल्हापुरी धक्का, समरजितसिंह घाटगे यांचं ठरलंच!

या घटनेनंतर चिराग पासवान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की नियमानुसार जो काही दंड असेल तो भरून टाकणार आहोत. दरम्यान, या नव्या व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे येथून जाणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो घेतात. जर गाडीचे फिटनेस, पोल्युशन किंवा इन्शुरन्स यामध्ये काही त्रुटी असतील किंवा गाडी मर्यादेपेक्षा जास्त वेगात असल्याचे दिसून आल्यास या सिस्टीम नुसार संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर चलन पाठवले जाते. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच जे नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याच्या उद्देशाने बिहार परिवहन विभागाने ही नवी प्रणाली सुरू केली आहे. या सिस्टीमनुसार जर वाहनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर ऑटोमॅटिक पद्धतीने चलन तयार होऊन संबंधित वाहनचालकांच्या मोबाईलवर सेंड केले जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img