20.4 C
New York

Jawhar : बाप्पाच्या स्वागताची घरोघरी अतुरता; कृत्रिम फुले आणि तोरणमाळांना पसंती

Published:

संदीप साळवे,पालघर

जव्हार: (Jawhar) लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्याने जव्हार शहर तथा ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण आहे, अबाल वृद्धांपासून लहानग्यापर्यंत बाप्पाच्या स्वागताची उत्सुकता वाढत चालली आहे.सजावटीच्या साहित्यांनी जव्हार बाजारपेठ सजली आहे. यंदाही घरगुती सजावटीला लागणाऱ्या तयार कमानी, कृत्रिम फुले, तोरणमाळा, स्टोनची अलंकारांना मागणी आहे. जवाहरोडसह शहरात विविध ठिकाणी विक्रेत्यांनी असे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. ५०० रुपयापासून १५०० रुपयांपर्यंत याचा दर आहे. बाजारात आकर्षक असे शंभरहून अधिक प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे.सजावटीसाठी कृत्रिम फुले आणि तोरणमाळांना अधिक पसंती मिळत आहे.

यंदा सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र आहे. सजावटीच्या साहित्यात लोखंडी फ्रेम, रंगीबेरंगी लाइटसह विविध सजावट साहित्याचा वापर करून तयार केलेली कमान मिळत आहे. कमानींच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येत आहे. बाजारात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध आहे.

सजावट साहित्याने , महात्मा गांधी चौक, सोनार आळी , अंबिका चौक , यशवंत नगर, मोर्चा आदी ठिकाणी सजावट साहित्य उपलब्ध झाले आहे. गणेशोत्सव पाच दिवसांवर आल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बाजारात गोल मण्यांची माळ, मोत्याची माळ, चंदनहार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा यांची मांडणी दुकानदारांनी केली आहे. यात वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व झिरमिळ्या, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे.

Jawhar फुलांच्या माळांचे आकर्षण

दुकानाबाहेर लटकविलेल्या या रंगीबेरंगी फुलांच्या माळा नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये मणी आणि रंगीत धाग्यांनी बनवलेल्या माळांचा समावेश आहे. काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यात बनवलेल्या माळा आहेत. सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगांतील झिरमिळ्या उपलब्ध आहेत. कृत्रिम फुलांनाही मागणी आहे. बाजारात विविध प्रकारची फुले ६० ते १३० रुपये डझन, ग्रास मॅट १०० ते १५० रुपये, बोन्साई फ्लॉवर पॉट, हँगिंग फ्लॉवर ४०० रुपये डझन,झेंडू माळा ५० पासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लास्टिक हार १०० ते २०० रुपये, मोती हार ३० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत आहेत.

जव्हार शहर तथा ग्रामीण भागात दरवर्षी गणेशोत्सव घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी साजरा होतो. यामध्ये बालकांपासून वयोवृद्ध उत्साहात सहभागी होतात. यामुळे आपल्या घरातील किंवा गल्लीतील गणपती मूर्तीची सजावट इतरापेक्षा वेगळी असावी याकडे लक्ष असते. यामुळे सजावटीच्या साहित्याची मागणी वाढते. कागदी आकर्षक फुलांच्या माळा, झिरमिळ्या, फुले, तसेच तोरणमाळ, कमानी, कुंदन टिकल्या, लाईटच्या माळा आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याची खरेदी देखील सुरू झाली आहे.

सनी उदावंत , सजावट साहित्य विक्रेते

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img