19.4 C
New York

Ajit Pawar : ‘लय पवार घरी यायला लागले आहेत, मात्र…’ बारामतीकरांना अजित पवारांची साद

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. ही यात्रा आज बारामती मतदारसंघात दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान बोलताना गेल्या काही दिवसांपासून घरात लय पवार येऊ लागेल आहे, गेल्या 25-30 जे आले नव्हते ते पण आता घरी येत आहे मात्र पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात असं अजित पवार म्हणाले.

जनसन्मान यात्रेदरम्यान आयोजित सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळाली म्हणून आम्ही आज मोठे निर्णय घेत आहे. बारामतीमध्ये आता बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लय पवार घरी यायला लागले आहे, गेल्या 25-30 वर्षात जे आले होते नव्हते ते देखील आता मतदारसंघात फिरत आहे. हे पवार आणि ते पण पवार मतदारसंघात फिरत आहे मात्र पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात आहे असं अजित पवार म्हणाले.

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; नगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक

तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही ही योजना बंद करणार नाही अशी ग्वाही देखील या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्वात जास्त विकास आपल्या बारामतीमध्ये झाले आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी सर्वात जास्त विकासनिधी बारामतीला मिळाला आहे. बारामतीसाठी लवकरच मी ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे तसेच बारामतीमध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar महिला अत्याचारावर अजित पवार म्हणाले…

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. बारामती आता शिक्षणाचं हब झालं आहे. अनेकजण बाहेरून बारामतीत शिकायला येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. बारामतीत आदरयुक्त दबदबा पोलिसांचा असला पाहिजे. आमच्या बारामतीतल्या मुलींची छेड काढली तर खपवून घेणार नाही. अजितदादांनी पोलिसांना टाईट केलं आहे. कुठल्या पक्षाचाही असो त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img