17.6 C
New York

Dombivli : 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये वाढतेय हृदयविकाराचे प्रमाण….

Published:

Dombivli : हल्ली धावपळीचे जीवन झाल्याने माणसाच्या दैनंदिन जीवनक्रमात अमूलाग्र बदल झाला आहे. 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुण पिढीने स्वतःसाठी वेळ देऊन आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला आयकॉन हॉस्पिटलचे डॉ.अजिंक्य आहुटी यांनी डोंबिवली ग्रामीण भागातील सागाव येथील रविकिरण सोसायटीतील भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिरात दिला.

रविवार 1 सप्टेंबर रोजी भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कल्याण जिल्हा सचिव सौरभ तिवारी वॉर्ड अध्यक्ष ( प्रभाग क्र.115 ) विनायक निपाणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांच्या हस्ते करण्याआले. यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनीही शिबिराला भेट दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.भाजपा पदाधिकारी सचिन म्हात्रे, सौरभ तिवारी,विनायक निपाणे,सरिता सोनार,विवेक नायर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या शिबिरात रक्त तपासणी, इसीजी,मधुमेह तपासणी,स्त्री रोग तपासणी करण्यात आली.

ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल


या शिबिरात आयकॉन हॉस्पिटलचे डॉ.अजिंक्य आहुटी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले कि, हल्लीची लाईफस्टाईल बदल्याने त्यांचा परिणाम आरोग्यवर होतो. 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुणांनी आपल्या आरोग्य करता स्वतःकरता वेळ देणे आवश्यक आहे.बदलती दैनंदिन जीवनशैली, फास्टफूड आणि तणाव यामुळे तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैलीत बदल करा, आपल्या आरोग्यकरता चांगले आहार सेवन करा,स्वतः करता वेळ द्या असा सल्ला दिला. तर भाजपा पदाधिकारी सचिन म्हात्रे म्हणाले, भाजपा नेहमीच नागरिकांच्या आरोग्यकरता मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवीत असते. तर सौरभ तिवारी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरता प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img