15.6 C
New York

Narayan Rane : ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल

Published:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने (MVA) जोडे मारो आंदोलन केले तर आता भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. अशी टीका खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे भ्रष्ट नेते आहे, त्यांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो, सरकारला गेट आऊट म्हणणारे तुम्ही कोण ? असा प्रश्न देखील यावेळी नारायण राणे यांनी विचारला. ठाकरेंनी महाराष्ट्राला 10 वर्ष मागे घेऊन गेले आहे, त्यांना कशाची माहिती नाही, उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही अशी टीका देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, आज उद्धव ठाकरे काँग्रेस (Congress) बरोबर आहे. राहुल गांधी माफीवीर असं म्हणून स्वातंत्रवीर सावरकांना हिणवलं मात्र उद्धव ठाकरे मुग गिळून गप बसले होते असं देखील यावेळी खासदार राणे म्हणाले.

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; नगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक

Narayan Rane शरद पवार आज पण लावालावी करत आहेत : नारायण राणे

तर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आज देखील शरद पवार लावालावी करत असून जाती जातीती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यावर केला. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला का? असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच जातीचं राजकारण नको म्हणून त्यांनी मोर्चे काढले का? पवारांची प्रत्येक क्रुती संशयास्पद आहे असा देखील आरोप त्यांनी यावेळी लावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img