26.5 C
New York

Devendra Fadnavis : ठाकरेंनी फक्त खुर्चीसाठी काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलंय; फडणवीसांचा आरोप

Published:

उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय. दरम्यान, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या घटनेवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे. अशातच महाविकास आघाडीकडून मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवलीयं. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे हे काँग्रेसला माफी मागायला लावणार आहेत का? तसेच काँग्रेसने मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा बुलडोझर लावून तोडला त्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकातही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने शिवरायांचा पुतळा हटवला, त्यावर ते एकही शब्द बोलत नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उणे-धुणे काढले आहेत.

तसेच शिवरायांनी सुरत लुटली असल्याचा इतिहास काँग्रेसने अनेक वर्षे शिकवलायं, पण शिवरायांनी सुरत ही लुटली नाही तर स्वराज्याचा खजिना त्या लोकांकडून घेतला होता, त्यांनी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी लुटली नव्हती, काँग्रेसने सुरत लुटल्याचा इतिहास सांगितलायं, त्यांनाही उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलायं.

पवार-ठाकरेंना सवाल करत, फडणवीसांनी सांगितला इतिहास

दरम्यान, काँग्रेसकडून मध्य प्रदेश कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला, सुरतबाबत काँग्रेसकडून खोटा इतिहास सांगण्यात आला, त्यावर आता उद्धव ठाकरे काँग्रेसलाही माफी मागायला लावणार की केवळ खुर्चीसाठी त्यांचं मिंधेपण स्विकारणार आहेत, अशी खोचक टीकाही फडणवीस यांनी केलीयं.

Devendra Fadnavis काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

राज्यात सध्या जे वातावरण आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. शिवद्रोही लोकं आपल्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आपण राजकारण करत आहोत असे ते म्हणतात. मात्र, ते करत आहेत ते राजकारण नसून गजकर्ण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या चुकीला माफी नाही. आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे ठिकाण निवडले आहे. शिवद्रोही सरकार बेकायदा बसलेले आहे. त्यांना गेट ऑऊट ऑफ इंडिया म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img