24.6 C
New York

Sanjay Raut : कालची माफी फक्त राजकीय, राऊतांचा मोदींवर घणाघात

Published:

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिलं. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं लागेल हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी काल राजकीय माफी मागितली. माफी उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागितली, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही फक्त ‘राजकीय माफी’ होती अशी टीका केली. मविआने जाहीर केलेल्या जोडे मारो आंदोलनात त्यांनी माफी मागितली असली तरी कोणताही बदल होणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मियता नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय, या संकटातून सुटका करण्यासाठी हे (माफीचं) पाऊल उचललं. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही असे ते म्हणाले. छ. शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. ती माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असं त्यांना वाटलं असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल.

सुपारी घेऊन मला…” मंत्री तानाजी सावंतांची जीभ पुन्हा घसरली

Sanjay Raut तर महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही

छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मियता नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय, या संकटातून सुटका करण्यासाठी हे (माफीचं) पाऊल उचललं. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही असे ते म्हणाले. छ. शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. ती माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असं त्यांना वाटलं असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल, असं राऊत यांनी खडसावून सांगितलं.

Sanjay Raut मविआचं आंदोलन सुरूच राहणार

छ. शिवरायांचा घोर अपमान महाराष्ट्रात,सरकारकडून झालाय. मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, पण महाराष्ट्रही त्याचं काम करेल, कर्तव्य पार पाडेल. उद्यापासून राज्यभरात सरकारला जोडे मारो आंदोलनात मोदींनी माफी मागितली असली तरी कोणताही बदल होणार नाही,असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img