15.6 C
New York

Jawhar : मधमाशी पालन जनजागृती सत्राचे आयोजन; ३६५ नागरिकांचा सहभाग

Published:

संदीप साळवे, पालघर

पारंपारिक शेती करत असताना, त्यास जोड धंदा असो अगर त्यात सुधारणा व्हावी (Jawhar) म्हणून जोड उपक्रम आखण्यात आला, जव्हार शहरातील घाची सभागृह येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता “अंडर द मँगो ट्री सोसायटी” मार्फत मधमाशी जन-जागृती सत्र आयोजित करण्यात आले.स्थानिक मधमाश्यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयी चर्चा करण्यात आली. १२४ महिला शेतकरी १३६ पुरुष शेतकरी, ५४ महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, संस्थेकडून २६ व उपक्रमातील २५ अश्या ३६५ नागरिकांनी सहभाग नोंदवला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर (आय. ए.एस.)आणि सुधांशू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नायर यांनी कृषी क्षेत्रात मधमाश्यांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न म्हणून त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. सुधांशू यांनी अंडर द मँगो ट्री सोसायटीच्या मधमाशी पालन उपक्रमाचे कौतुक केले आणि या बाबी प्राकृतिक शेतीला लाभदायक असल्याने या बाबीचा समवेश करण्याचा सल्ला दिला. पुढे डॉ. गोपाल पालिवाल, कार्यकारी संचालक वर्धा, डॉ. लक्ष्मी राव – पूर्व सहायक निदेशक पुणे, शैलजा नायरसंचालक आणि मनीलाल वाघेरावरिष्ठ तांत्रिक तज्ञ, यांनी आपले अनुभव आणि ज्ञान वाटून डॉ. गोपाल यांनी आग्या मधमाशीची महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांच्या परागीभवन योगदानाबद्दल तंत्रशुद्ध माहिती दिली. डॉ. लक्ष्मी राव यांनी वनस्पतींच्या विविधतेचा आणि मधमाशांच्याच्या आरोग्याचा जटिल संबंध यावर प्रकाश टाकला, शैलजा नायर यांनी अंदर द मैंगो ट्री सोसायटीचे कार्यावर आपले विचार आणि अनुभव व्यक्त केले तसेच मनीलाल वाघेरा यांनी परागिभवनामध्ये योगदान आणि महिला मधमाशी पालकांच्या भूमिकेविषयी व्यावहारिक माहिती दिली.

माजी खासदार गावित यांची रेल्वे मागणी मान्य; मार्ग सर्वेक्षणासाठी अडीच कोटी मंजूर


सर्व सत्रे माहितीपूर्ण ठरली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये झालेल्या चर्चानी मधमाशांचे पारिस्थितिकी संतुलन आणि शाश्वत कृषीत त्यांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक मधमाशाच्या संवर्धनाची गरज स्पष्ट झाली आहे. मधमाशी पालन केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण पर्यावरणासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, पालघर जिल्ह्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, गोखले एज्युकेशन सोयायटीचे ग्रामीण विकास विभागाचे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक, शेतकरी आणि मधमाशी पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img