15.6 C
New York

Congress Party : काँग्रेसला मोठा धक्का! मराठवाड्यातील आमदाराचा राजीनामा

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या राजकीय घडामोडी (Maharashtra Elections) घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत अभेद्य राहिलेल्या महाविकास आघाडीला तडे जाऊ लागले आहेत. काँग्रेसलाच मोठा (Congress Party) धक्का बसला आहे. देगलूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता अंतापूरकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. जितेश अंतापूरकर कधीही राजीनामा देऊन महायुतीत जातील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटल्याचा आरोप झाला होता. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांचं नाव पुढं आलं होतं. याच हिरामण खोसकर यांच्याबरोबर आमदार अंतापुरकरांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत अंतापूरकर यांनी मात्र नकार दिला होता. काँग्रेस सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली होती असे अंतापूरकर म्हणाले होते. आता मात्र त्यांनी काँग्रेस सोडल्याचीच बातमी येऊन धडकली आहे.

मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही याची जाणीव त्यांना झाली होती. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती त्यात जितेश अंतापूरकरांचाही समावेश होता असा संशय काँग्रेसला होता.

Congress Party पोटनिवडणुकीत अंतापूरकर विजयी

क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असलेल्या आमदारांपैकी पक्ष सोडणारे जितेश अंतापूरकर हे पहिलेच आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले होते. मात्र २०२१ मध्ये कोव्हिड काळात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश विजयी झाले. जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी जितेश अंतापूरकरांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा अंतापूरकर यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img