17.6 C
New York

Dahi Handi : राज्यभर दही हंडी उत्सवाचा ‘थर’थरार! मुंबईत 129 गोविंदा जखमी

Published:

काल राज्यभरात उत्सवात दहीहंडी थरांचे थरार पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Dahi Handi) मुंबईत दरवर्षीच मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेल्या दहीहंडी मोठमोठे फोडल्या जातात. मात्र, यामध्ये अनेक गोविंदा जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

एकावर एक मनोरे रचत उंचावर बांधलेल्या दही हंड्या फोडून अनेक मंडळांनी विक्रम रचण्याचा प्रयत्न केला. उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागलंच. मुंबईत संपूर्ण दिवसभरात 129 गोविंदा जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर ठाण्यात दिवसभरात 19 गोविंदांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे, जखमी झालेल्या गोविंदांमध्ये बालगोविदांचाही समावेश आहे.

एकीकडे राज्यभरात दही हंडीचा (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे या उत्सवाला कुठेतरी गालबोटही लागलं. यंदा मुंबईमध्ये (Mumbai Dahi Handi) विविध ठिकाणी दही हंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत 129 गोविंदा जखमी झाले. यातील 19 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हर्षवर्धन पाटील-पवारांमध्ये अडीच तास खलबतं, फडणवीस म्हणाले…

दही हंड्या फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दही हंडी उत्सावाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. मंगळवार सकाळपासून विविध ठिकाणी दही हंडी फोडण्यास सुरुवात झाली.

Dahi Handi गोविंदा पथकांकडून नियम पायदळी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठमोठ्या दही हंड्यांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं. यंदा अनेक गोविंदा पथकांनी दही हंडीसाठी न्यायालयानं आखून दिलेली मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाच्या आदेशानुसार, गोविंदा पथकांमध्ये 14 वर्षांखालील मुलामुलींना सहभागी करण्यात आलं होतं. तर, आयोजकांनीही या मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img