24.6 C
New York

Sharad Pawar : तर मी…; पुण्यात भर पावसात पवारांनी दिलेल्या शपथेत काय?

Published:

पुणे : बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले. पुणे स्टेशन परिसरात मुसळधार पावसात शरद पवार (Sharad Pawar) , सुप्रिया सुळेंसह अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी पवारांनी पावसात स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली.

Sharad Pawar शरद पवारांनी वाचलेल्या शपथेत काय?

मी, अशी शपथ घेतो की, मी स्त्रिायांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर, त्याला मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखेन, या पुण्यानगरीमध्ये नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद!

‘या’ गोष्टीला एकटे पवारचं जबाबदार; राज ठाकरेंकडून पवार पुन्हा टार्गेट

Sharad Pawar बदलापूर घटनेमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का

उपस्थितांना संबोधित करताना पवार म्हणाले की, बदलापूर घटनेमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला आहे. एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नसल्याचे पवार म्हणाले. बदलापूर येथे घडलेल्या प्रकाराचा निषेध होत असताना राज्यातील आणखी काही ठिकाणी अशाच दुर्दैवी घटना घडल्याचे पवार म्हणाले. हे राज्य शिवछत्रपतींचं आहे. त्यांनी आपल्या राजवटीत एका महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार आल्यानंतर त्या आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img