20.4 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, ‘जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार’

Published:

25 दिवस ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन पूर्ण झाले आहेत. (Bigg Boss Marathi) सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. (Bigg Boss Marathi) प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता हळूहळू त्याला कळू लागला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण (Suraj Chavan) उभा राहणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत (Abhijit Sawant) आणि आर्या जाधवला (Arya Jadhav) म्हणत आहे, “जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार… बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर?

‘फुल ऑन राडा…’, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क

Bigg Boss Marathi ‘बिग बॉस’ खतरनाक आहेत : अरबाज पटेल

अरबाज पटेल ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात म्हणत आहे,”बिग बॉस’ खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे”. त्यावर अंकिता म्हणते,”मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील (Purushottam Patil), योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि निखिल दामले (Nikhil Damle) हे सदस्य बाहेर पडले आहेत. सर्वांचं लक्ष या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे लागलं आहे. यासाठीच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img