26.5 C
New York

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात सुरजला ‘या’ अभिनेत्रीने बांधली राखी

Published:

प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) या सिझनला मिळतो आहे. रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात आहे. त्याचा साधेपणा आणि त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडतो आहे. घरातील स्पर्धकांचा गेम, त्यांचा वावर यावर प्रेक्षकांची असणारी प्रतिक्रिया सगळ्यांना पाहायला मिळतेय. मुंबई- बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर या घरातील वेगवेगळे वाद सतत चर्चेत येत आहेत. स्पर्धक सदस्यांचा घरात कोणतेही टास्क आले की हैदोस सुरू होतो. त्यामुळे आपापल्या आवडत्या कलाकारांना वाचवण्यासाठी बाहेर प्रेक्षकांमध्येही खडा जंगी सुरू होते.

Bigg Boss Marathi सूरज आणि DP मध्ये डान्सची जुगलबंदी

भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला होणार आहे. “असं कोण आहे जो नॉर्मल दिसतो पण अचानक त्याच्या अंगात येतं.” यावेळी रितेश म्हणतो, हे म्हणताच DP सूरजचं नाव घेतो. पुढे सूरज आणि DP ‘अंगात आलंया’ या गाण्यावर डान्स करतात. सूरज बेभान नाचतो. त्याला DP ची तगडी साथ मिळते. दोघांच्या डान्सचा आनंद रितेशभाऊ घेताना दिसतो.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; म्हणाली

Bigg Boss Marathi पायलने बांधली सूरजला राखी

‘अबीर गुलाल’ मालिकेची टीम बिग बॉस मराठीच्या घरात भेटीला येणार आहे. यावेळी श्री अर्थात मालिकेतील अभिनेत्री पायल जाधवने सूरजला खास राखी बांधली. “तुझा मला खूप अभिमान वाटतो”, पायलने सूरजला असं म्हणत राखी बांधली. इतकंच नव्हे तर सूरज पायलच्या राखी बांधल्यावर पाया पडला. ही कृती सर्वांना आवडली. सूरजच्या खेळाचं अशाप्रकारे या आठवड्यात खऱ्या अर्थानेकौतुक झालेलं दिसलं..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img